NewsHub के साथ गर्मागर्म विषयों पर ताज़ातरीन ख़बरों के अपडेट प्राप्त करें। अभी इन्स्टाल करें।

अंगावरुन ट्रेन जाऊनही तो वाचला

१७ जुलाई, २०१७ १२:३० अपराह्न
21 0

भोपाळ, दि. 17 - यावर विश्वास बसणार नाही पण खरं आहे. मध्यप्रदेशमध्ये एका वयोवृद्धाच्या अंगावरुन ट्रेन जाऊनही तो वाचला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जर कोणाच्या अंगावरुन ट्रेन जाऊनही तो जिवंत राहत असेल तर तो चमत्कारच म्हणावा लागेल. असाच चमत्कार मध्यप्रदेशमधील सतना रेल्वे स्टेशनवर झाला आहे. सतनातील जवाहर नगरमध्ये राहणारे वयोवृद्ध राधेशाम दोन प्लॅटफॉर्मच्या मधील रेल्वे पटरी पार करण्याचा प्रयत्न करत होते. ते प्लॅटफॉर्म एकच्या रेल्वे पटरीवर पोहलचे असताना अचानक मालगाडी आल्यामुळे ते पटरीवरच अडकले. समोरुन मालगाडी आल्याचे पाहून राध्येशाम त्या पटरीवर झोपले.

हिंदूस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राधेशामच्या अंगावरुन तीन मिनीटापर्यंत मालगाडी गेली. त्यावेळी ते मालगाडीच्या खाली पटरीवर झोपले होते. मालगाडी गेल्यानंतर ते पटरीवरुन उठून निघून गेले. यादरम्यान राधेशाम यांना कुठेही काही दुखापत झाली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडोमध्ये राधेशाम पटरीवर झोपलेले दिसत आहेत. त्यांच्या अंगावरुन जाणारी मालगाडीचा वेग जास्त नव्हता. मालगाडी अंगावरुन जात असताना राधेशाम घाबरले नाहीत. जीव मुठीत घेऊन ते दोन पटरीच्या मध्ये झोपलेले आहेत. मालगाडी गेल्यानंतर ते पटरीवर उठून बसतात, त्यावेळी ते घाबरलेले असल्याचे दिसून येते. घाबरले असल्यामुळे त्यांना नीट उठताही येत नव्हते. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. देव तारी त्याला कोण मारी अशा कमेंट पास केल्या जात आहेत.

स्रोत: lokmat.com

सामाजिक नेटवर्क में शेयर:

टिप्पणियां - 0